हवामान आणि जमीन
हवामान: तुर मुुुख्यत्वे उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात वाढते. शाखीय वाढीसाठी तुरीला उष्ण व दमट हवामान गरजेचे असते.
जमीन: तुर हे पीक रेताळ जमिनीपासून ते चिकणमाती पर्यंत वाढवल्या जाऊ शकते. जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.
जमिनीची मशागत: तुरीची मूळे खोलवर जात असल्याने जमीन 15 सेंमी इतकी खोलवर नांगरून घ्यावी. नंतर 2 ते 3 वाखराच्या पळ्या द्याव्या.
पेरणीची वेळ: खरीपातील कोरडवाहू तुरीची पेरणी जून महिण्याच्या शेवटच्या आठव्यापासून ते जुलै च्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायती तुरीची लागवड जून च्या सुरुवातीला करावी. दोन तासांतील अंतर हे तुरीमध्ये 6 ते 9 फूट इतके ठेवावे तर दोन झाडांतील अंतर हे किमान 1 ते कमाल 2 फूट इतके ठेवावे.
बीजप्रक्रिया: बियाणे पेरण्यापूर्वी कार्बेन्डाझिम किंवा थायरम 3 ग्राम प्रती किलो बियाणे ची प्रक्रिया करावी. परत थायमिथॉक्झम 30% FS 5 मिली प्रति किलो बियाणे तसेच रायझोबियम 25 ग्राम प्रती किलो बियाणे या जिवाणू खताची प्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन: तुर हे पीक रासायनिक खतांना फारसा प्रतिसाद देत नाही. 10 टन चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या कोळपणीच्या वेळी जमिनीमध्ये मिसळावे. 20 कीलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 25-30 किलो पालाश प्रति हेक्टरी सर्व पेरणी सोबत द्यावे.
पाणी व्यवस्थापन: तुर हे पीक अत्यंत कमी (200-250 मिमी) पावसातही चांगल्या प्रकारे येते. खरिपातील तुरीला सहसा पाणी देण्याची गरज नसते पण तरीसुद्धा जर फुले येण्यापूर्वी एक पाणी दिले तर फुलांच्या संख्येत भरपूर वाढ होते. तसेच सर्व फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये झाले की एक शेवटचे पाणी द्यावे त्यामुळे शेंगांचा विकास चांगल्याप्रकारे होतो.
तण नियंत्रण: तुरीमध्ये तण नियंत्रण महत्त्वाचे असते. कारण ताणामुळे तुरीच्या उत्पादनामध्ये 90% पर्यंत घट होऊ शकते. त्यासाठी उगवण पूर्व तणनाशक अलाक्लोर 3 लिटर प्रति हेक्टर किंवा फ्लूकलोरालीन 1 किलो active ingredient (सक्रिय घटक) प्रति हेक्टरी वापरावे. याशिवाय डवरणी आणि निंदन करावेे.
No comments:
Post a Comment