शेतकरी मित्रांनो तूर हा भारतीय आहारामधील एक महत्त्वाचा घटक आहे. तुरीला काही भागात अरहर सुद्धा म्हणतात. तुरीला प्रामुख्याने डाळीच्या स्वरूपात खाल्ले जाते. तुरीमध्ये प्रामुख्याने लोह, आयोडीन आणि महत्त्वाचे अमिनो ॲसिड्स आढळतात. तुरीचे कुटार गुरांना खाद्य म्हणून वापरले जाते. हवामान आणि जमीन हवामान: तुर मुुुख्यत्वे उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात वाढते. शाखीय वाढीसाठी तुरीला उष्ण व दमट हवामान गरजेचे असते. जमीन: तुर हे पीक रेताळ जमिनीपासून ते चिकणमाती पर्यंत वाढवल्या जाऊ शकते. जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. जमिनीची मशागत: तुरीची मूळे खोलवर जात असल्याने जमीन 15 सेंमी इतकी खोलवर नांगरून घ्यावी. नंतर 2 ते 3 वाखराच्या पळ्या द्याव्या. पेरणीची वेळ: खरीपातील कोरडवाहू तुरीची पेरणी जून महिण्याच्या शेवटच्या आठव्यापासून ते जुलै च्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायती तुरीची लागवड जून च्या सुरुवातीला करावी. दोन तासांतील अंतर हे तुरीमध्ये 6 ते 9 फूट इतके ठेवावे तर दोन झाडांतील अंतर हे किमान 1 ते कमाल 2 फूट इतके ठेवावे. बीजप्रक्रिया: बियाणे पेरण्यापूर्वी कार्बेन्डाझिम किंवा थायरम 3 ग्राम प्रती किलो